राज्यात १५६ नवीन रुग्ण

मुंबई: राज्यात मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या (corona patients) मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे राज्यात शून्य मृत्यू होण्याची ही पाचवी वेळ झाली असून यापूर्वी २, ७, ९, २१ तसेच २२ मार्च अशी पाच वेळा शून्य मृत्यू नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे.

दरम्यान, मंगळवारी राज्यात १५६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७२,६६८ झाली आहे. तर काल २६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२३,७३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे.

तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९०,२५,५२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७२,६६८ (०९.९६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात आज रोजी एकूण १,१५९ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत २६ बाधित

मुंबई (Mumbai) महानगरपालिका क्षेत्रात २६ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५६,६९३ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६९३ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here