पालिकेचे सर्वांसाठी पाणी धोरण

‘सर्वांसाठी पाणी ’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज शुभारंभ

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या तोंडावर पालिकेने ‘सर्वांसाठी पाणी ’ धोरण (Water For All policy) बनवले आहे. या धोरणाच्या अंतर्गत पालिकेच्या विविध जाचक नियमांमुळे ओसी नसलेल्या इमारतींना, झोपडपट्टीतील घरांना खासगी जमिनीवरील अघोषित झोपडीधारक, तटीय नियमन क्षेत्रात अर्थात सीआरझेड परिसरात राहणारे झोपडीधारक, सरकारी जमिनींवरील झोपडीधारक इत्यादींना देखील मानवीय दृष्टिकोनातून जल जोडणी दिली जाणार आहे.

महापालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी ‘ या धोरणाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शुभहस्ते ७ मे रोजी सायंकाळी ‘गोरेगांव पूर्व’ परिसरातील नागरी निवारा परिषदेच्या जवळ असणा-या ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान’ या ठिकाणी करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका (BMC) दररोज तब्बल ३८५ कोटी लीटर म्हणजेच ३ हजार ८५० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा मुंबईकरांना करते. हा पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत सध्या ४ लाख ६० हजार अधिकृत नळजोडण्या आहेत. मात्र, असे असले तरी मुंबई महापालिकेच्या काही प्रचलित व पूर्वीच्या नियमांमुळे विविध प्रवर्गातील झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नळजोडणी देता येत नसे. त्यामुळे अशा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि विशेष करुन महिला वर्गाला विविध अडचणींना सामोरे जावे लागत असे.

ही बाब लक्षात घेऊन व मानवीय भूमिकेतून विविध प्रवर्गातील झोपडपट्टयांमध्ये व निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी ’ या धोरण बनवले असून त्याचा लाभ खा करून झोपडपट्टीतील नागरिकांना ज्यांना पाणी मिळत नव्हते त्यांना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here