@maharashtracity

माझा डॉक्टर वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत

मुंबई: कोविड (covid) आणि त्यातून सतत निर्माण होणारे स्ट्रेन पासून संरक्षण करण्यासाठी मास्क (Use of Mask) हा उत्तम पर्याय असून सोबतच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत रविवारी झालेल्या ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत सहभागी झालेल्या टास्क फोर्स सदस्यांनी (Task Force Members) आणि तज्ज्ञांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील (Harvard University, USA) डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट (third wave of the corona) आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे असे सांगितले. ते म्हणाले, अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करायला लागले. त्यातून कोविड पसरण्याची शक्यता आहे.

अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा (Delta) फ़ैलाव वेगाने होतो आहे. डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन (New strain of covid found in Columbia) आढळून आल्याचे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले.

संभाव्य लाटेची शक्यता गृहित धरून राज्य सरकार, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी तयारी सुरु केली आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक (Dr Sanjay Oak) यांनी व्यक्त केली.

कोविडची विविध लक्षणे आढळली, काही रुग्णांना चव आणि वास येत नाही, पोटरीचे स्नायू आणि पाठदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसले. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारणे आवश्यक असून ‘जाणता मी, जबाबदार मी’ ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.

दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते. मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी (RT-PCR test) करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले.

तसेच मास्क घालून कोविडला घराबाहेरच ठेवणे हे आपले सर्वाचे आद्यकर्तव्य असल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले.

कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपल्याला हर्ड (Heard Immunity) आणि हायब्रीड इम्युनिटी (Hybrid Immunity) पहायला मिळाली. सरकारने विशेष लक्ष पुरवल्यामुळे धारावीत परिस्थिती यशस्वीपणे हाताळता आली. दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये (Dharavi) रोजची रुग्णसंख्या २० पेक्षा अधिक आढळले नाहीत. हे केवळ हर्ड इम्युनिटीमुळे झाल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

कोविडची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात (quarantine) राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी डॉक्टरांनी बोलण्याचे आवाहन करतानाच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले.

फोर्टिस रुग्णालयाचे (Fortis Hospital) डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोविडने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. एखाद्या गुरुसारखे कोविडने आपल्याला शिकवले आहे. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देतानाच कोविडचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन डॉ पंडित यांनी केले. ऑक्सिजन प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात, असेही ते म्हणाले.

डॉ. अजित देसाई म्हणाले, कोविड पश्चात लक्षणे ही मुख्यतः ४ ते १२ आठवडे असतात. ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये (Asymptomatic patients) सुद्धा ही लक्षणे दिसतात. सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घ काळची लक्षणे मानले जातात.

थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तणावात जाणे, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात असे डॉ देसाई यांनी सांगितले.

तिसरी लाट बालकांसाठी घातकी असल्याने बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी यांनी सांगितले की, पहिल्या दोन लाटेत मुलांमध्ये कोविडचे कमी संक्रमण झाले. मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते. त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो. रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत.

गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहेत. मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोविडसेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे, असे सांगून डॉ प्रभू म्हणाले, या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी फोनवरुन अथवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here