@maharashtracity

राज्यात सोमवारी ९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७७,९९३ झाली आहे. काल ७० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२९,१३३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १०१६ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

राज्यात सोमवारी १ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०२,२६,३७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७७,९९३ (०९.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ५६ कोरोना बाधित :

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ५६ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५९०४८ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९५६३ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here