@maharashtracity

आरोग्य भरती परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ

परीक्षार्थींची समाज माध्यमांवर जोरदार टीका

मुंबई: एकाच दिवशी दोन ठिकाणचे हॉल तिकीट, प्रश्नपत्रिका फुटणे, जागा न मिळणे, पेपरांची अदलाबदल होणे आदी गोंधळातून रविवारी राज्य आरोग्य विभागाची परीक्षा सुरु झाली. ’आमचे भविष्य अंधारात लोटणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध…. ‘ ’टोपे साहेब, तुम्ही राजीनामा द्या…‘, ’गरीब, शेतकऱ्यांच्या मुलांच्या आयुष्याशी का खेळताय…. ?‘, ’हेच का परीक्षेचे नियोजन…. ?‘, ’तुम्हाला तुमच्या पदावर राहण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही….‘ (chaos in the exam of the health department for the third time)

आरोग्य विभागातील भरती परिक्षेला घेवून अशा सारखे संताप व्यक्त करणारे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे ट्विट रविवारी समाज माध्यमांवर झळकले.

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांची प्रतिक्रिया येणे अपेक्षित असून काही ठिकाणी गोंधळ झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून दुजोरा देण्यात आला. मात्र या परिक्षार्थींचे नुकसान होऊ देणार नासल्याचेही सांगण्यात आले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील गोंधळाची हि तिसरी घटना आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या आरोग्यसेवेत थेट पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षा मागील महिन्यात आयत्या वेळी रद्द करण्यात आली. रविवारी घेण्यात आलेल्या क गटाच्या परीक्षेत गोंधळ पाहायला मिळाला.

मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik) आणि राज्यातील केंद्रावर अशा स्वरूपात गोंधळ असल्याचे परीक्षार्थींच्या ट्विट वरून समोर आले. काही ठिकाणी सील फुटलेल्या पेपर पाहायला मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुपारी ३ ते ५ या वेळेत होणाऱ्या परीक्षांचे पेपर व्हाट्सअपला आले असल्याच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत.

त्यामुळे संतापलेल्या परीक्षार्थीनी टोपे साहेब, तुम्ही राजीनामा द्या, आमचे भविष्य अंधारात लोटणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध असो, का तुम्ही गरीब, शेतकऱ्यांच्या मुलांच्या आयुष्याशी खेळताय? परीक्षेचे हेच का नियोजन? तुम्हाला तुमच्या पदावर राहण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही. अशा सारखे संताप व्यक्त होणारे परीक्षार्थींचे ट्विट पाहण्यात आले.

या सह परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर नसल्याचे, एकाच बाकावर दोन विद्यार्थी कसे बसू शकतात?, एकाच दिवशी दोन शहरांतील दोन केंद्रांवर परिक्षा घेणारे हॉल तिकीट, उमेदवारांना प्रवेशपत्र दिल्यानंतर त्यांना पैसेच भरले नसल्याचे कारण सांगून परिक्षेला मज्जाव करण्यात आले असल्याच्या तक्रारी देखील मांडण्यात आल्या.

दरम्यान, या गोंधळावर बोलताना आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गोंधळानंतर आझम कॅम्पस परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा सुरू झाली. १० वाजताची परिक्षाची वेळ असताना ११ः३० वाजता पेपर पुन्हा सुरू झाले. विद्यार्थींना परीक्षेसाठी २ तासाचा वेळ वाढवून देण्यात आला.

या गोंधळासंदर्भात वरिष्ठांना कळवण्यात येणार असल्याचे डॉ. संजोग कदम यांनी सांगितले. तर आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी सांगितले की, गट क ची परीक्षा झाली. ही २ पाळ्यांमध्ये घेण्यात आली असून या परिक्षेला ४ लाख विद्यार्थी बसले असल्याचे पाटील म्हणाल्या.

“न्यासामार्फत परीक्षा घेतली गेली तयारी पूर्ण झाली नाही म्हणून परीक्षा पुढे ढकलली. काही जिल्ह्यात घटना घडल्या. प्रश्न पत्रिकासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. वाहन चालक परीक्षात वेळ वाढून दिली. तर २ ठिकाणी परीक्षा पेपर अदलाबदल झाली असून ज्या ठिकाणी उमेदवाराची चूक नाही,” असे पाटील म्हणाल्या.

ज्या ठिकाणी गोंधळ झाला तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. ज्या ठिकाणी प्रश्न पत्रिका उशिरा पोहचल्या, त्या ठिकाणी जास्त वेळ वाढवून देण्यात आली आहे. काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला त्यांना समजून सांगितलं असल्याचेही सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here