इंडोसायनाईन ग्रीन डाय उपचार पद्धतीमुळे महिलांना दिलासा

@maharashtracity

मुंबई: कर्करोगावर उपचार करताना कर्करोगग्रस्त अवयव शस्त्रक्रिया करुन काढून टाकला जातो. यातून शरिरावरील गेलेल्या अवयवाची उणीव सतत रुग्णाला भासत असते. यात स्तन कर्करोगग्रस्त महिला रुग्ण (breast cancer patients) असल्यास तिचे स्तन काढल्यास तीच्या महिला असण्याच्या रुपापासून ते आईपर्यंतच्या अस्तित्वाचे शल्य सतत टोचत असते. मात्र यातून आता सुटका मिळणार आहे.

कर्करोगावरील इंडोसायनाईन ग्रीन (आयसीजी) या डाय उपचार (indocyanine green dye treatment) पद्धतीत नेमके कर्करोगाच्या पेशी हेरुन कर्करोगाच्या पेशीच नष्ट करण्यात येणार आहे. या पद्धतीमुळे महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, ही नवी पद्धत नुकतीच केईएम रुग्णालयात (KEM Hospital) वापरण्यात आली आहे.

नव्या यंत्रातून इंडोसायनाईन ग्रीन नावाचे रसायन रुग्णाला इंजेक्शनच्या रुपात टोचले जाते. हे रासायनिक द्रव्य टयुमर असलेल्या शरीर परिसरात दिले जाते. त्यावेळी टयुमर पसरलेले शरिराचा भाग रंगीत होतो. या रंगामुळे डॉक्टरांना नेमका कर्करोगग्रस्त असलेला शरिराचा भाग समजतो.

या पद्धतीमुळे स्तन कर्करोग प्रकरणात पूर्ण स्तन काढण्याची गरज भासत नाही किंवा शरिरातील अन्य कर्कग्रस्त भाग समजून आल्याने तो काढावा लागत नाही. यातून निव्वळ कर्कग्रस्त पेशीच काढल्या जातात. शरिरात कोणतीही कर्क पेशी उरतच नाही. शिवाय अवयवाचेही संवर्धन होते. हे स्तन कर्करोगग्रस्त महिला रुग्णांना मानसिक आधार देणारे ठरत आहे.

दरम्यान, कर्करोग तज्ज्ञांच्या मतानुसार ३० ते ४० वयोगटातील महिलांना सध्या स्तन कर्करोगाचा संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येते. त्यामुळे तरुण महिलांना ही उपचार पद्धती दिलासा देणारी ठरणार आहे. आतापर्यंत चार रुग्णावर या उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here