हेलिपॅड ची जागा विकल्याने प्रशासनासमोर गंभीर संकट
नवीन हेलिपॅड ची तयारी
@maharashtracity
By मिलिंद माने
महाड (mahad) औद्योगिक क्षेत्रातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मागील अनेक वर्ष कार्यरत असलेले हेलीपॅडची ( helipad) जागा एका खाजगी रासायनिक कंपनीला महाविका आघाडी सरकारच्या उद्योग खात्याने विकल्यानंतर मागील वर्षाची पूरस्थिती व आपत्कालीन परिस्थिती महाड पोलादपूर मध्ये उद्भवल्यास हेलिपॅड नसल्याने प्रशासनासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे.
यासाठी पुन्हा महाड शहरा नजीक म्होप्रे गाव हद्दीत सार्वजनिक बांध काम खात्या मार्फत नवीन हेलिपॅड तयार करण्यास सुरुवात झाली असून हा येत्या १५ दिवसात तयार करण्यात येणार असल्याची माहिती सां.बा. खात्याचे उप विभागीय अभियंता शिवलिंग उलागडे (shivling ulagade )यांनी दिली.
महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये सन १९९९ पासून जानेवारी २०२२ पर्यंत येथील हेलीपॅड कार्यरत होते.
या हेलिपॅड चा वापर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपासून राज्यपाल व अति महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत केला जात होता .तसेच मागील वर्षी महाड व पोलादपूर तालुक्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात एन डी आर एफ( NDRF) या यंत्रणेंकडून महत्त्वाच्या काळात झाला.
महाड येथील औद्योगिक वसाहती मधील हेलिपॅड ची जागा महाविकास आघाडी सरकार ( MVA) मधील उद्योग खात्याने ओरिएंट ॲरोमॅटिक अँड सन लिमिटेड (orient aromatic and sons limited) या कंपनीला कंपनी उभारण्याकरता देऊन टाकली आहे.
मात्र ही जागा देत असताना त्या जागेवर हेलीपॅड आहे त्यात त्याचा वापर औद्योगिक वसाहती मधील कंपनी व्यवस्थापक तसेच राज्य व केंद्र सरकारच्या विविध खात्यांना वापरासाठी येत होता याची तसदी देखील उद्योग खात्याने घेतली नाही परिणामी आपत्कालीन परिस्थितीत महाड व पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन साहित्य पोहोचवण्याकरिता हेलिपॅड कुठे उभारणार असा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडला आहे.
यंदा जर जुलै महिन्यात महाड मध्ये आपत्कालीन परस्थिती निर्माण झाली तर रेस्क्यू साठी येणाऱ्या हेलिकॉप्टर ला उतरण्या साठी हेलिपॅड उपलब्ध नाही .
गेल्या वर्षी उद्भवलेल्या परस्थिती चा शासनाने विचार करून जो पर्यंत नवीन हेलिपॅड तयार होतनाही तो पर्यंत औद्योगिक क्षेत्राच्या हेलिपॅड च्या जागेचा विचार करणे गरजेचे होते.आज हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागल्या ची वेळ या ठिकाणी प्रशासनाला अली आहे.
सध्या महाड शहरा नजीक मोहप्रे गाव हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गा लागत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन हेलिपॅड च्या कामाला सुरुवात झाली आहे या साठी महामार्ग विभाग,नगरपालिका आणि खासगी आशा तिन जागे मधून २४ गुंठ्याच्या प्लॉट मध्ये हे हेलिपॅड तयार करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
सध्या तयार होत असलेल्या हेलिपॅड ला जवळ पास एक महिन्याची कालावधी नक्कीच लागणार आहे.मात्र यंदा पुन्हा महाड मध्ये पूरस्थिती उद्भवलीतर प्रशासना समोर मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
ज्यावेळी महाड औद्योगिक वसाहती मधील हेलिपॅड ची जागा उद्योग खात्याने विकली त्या नंतर तब्बल सहा महिन्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे .त्याच वेळी या ठिकाणी नवीन हेलिपॅड उभारणीस सुरवात केली असती तर आता पर्यंत आपत्कालीन परस्थिती उद्धभवल्यास यंदा त्याचा वापर होऊ शकला असता .
पावसाळा असल्याने तातडीच्या परिस्थितीत हेलीपॅड उभारणे ही देखील तारेवरची कसरत आहे.सध्या सार्वजनिक बांध काम खात्यात २२ वर्षाचा अनुभव असलेले उप विभागीय अभियंता शिवलिंग उलागडे हे या हेलीपॅड चा काम काज पाहत आहेत मात्र अनुभव पाहता या ठिकाणी चांगल्या प्रकारे आणि लवकर हे तयार होईल अशी आशा नागरिकांन कडून केली जात आहे.
महाड हा पुरग्रस्थ भाग आहे .या ठिकाणी हेलीपॅड नाही रेस्क्यू साठी हेलिकॉप्टर ची गरज भाजते त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत हेलीपॅड चे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या मोहप्रे गाव हद्दीत नवीन हेलीपॅड चे काम सुरू आहे.हे २४ गुंठ्यांत होणार असून येत्या १५ दिवसात तयार करण्यात येईल.शिवलिंग उलागडे. उप विभागीय अभियंता सा. बा. विभाग.