@maharashtracity
घरच्या घरी टेस्टिंगने आजार लपवाछपवीची भीती
मुंबई: गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना (corona) आणि व्हेरियंटच्या तपासणीत बराच बदल घडला असून आता बाजारात सेल्फ टेस्ट किट (Self Test Kit)आले आहेत. या टेस्ट किटची विक्री जोमात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र यामुळे बऱ्याच रुग्णांची नोंद होणार नसल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सध्याच्या वेगाने पसरणाऱ्या संसर्गात रूग्ण नोंद आणि निदान होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सूचित करत आहेत.
दरम्यान, मुंबईत (Mumbai) दररोज दुपटीने रूग्ण वाढ होत आहे. यात पालिकेने टेस्ट सुरु केल्या आहेत. मात्र सेल्फ टेस्ट किट मोठ्या संख्येने विकल्या जात असल्याचे औषध विक्रेते सांगतात. सध्या कोरोनाला सरावल्याने लोक जागरूक झाली आहेत. त्यामुळे संशय आल्यावर स्वतःहून डॉक्टरकडे जाणे, स्वतःहून टेस्ट करणे सारख्या गोष्टी करत असल्याचे पालिकेच्या एका वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
तर मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सचे (MyLab Discovery Solutions) संस्थापक हसमुख रावल यांनी सांगितले की, देशात कोविड प्रकरणांच्या वाढीच्या काळात तुलना केल्यास नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरपासून सेल्फ-टेस्ट किटच्या विक्रीत 200% वाढ दिसून आली असल्याचे सांगितले.
मुंबईसारख्या शहरांत स्व-चाचणी किटची खरेदी करणारे खरेदीदार याच काळात वाढले. कोव्ही सेल्फसारखे (CoviSelf kit) स्वटेस्ट किट ओमिक्रोनसह (Omicron) कोरोना व्हायरसचे प्रमुख प्रकार शोधते असे तज्ज्ञ सांगत असल्याने किट खरेदी वाढली असल्याचे ते म्हणाले.
याचं काळात महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल (West Bengal), राजस्थान (Rajasthan), दिल्ली (Delhi) आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) अशा कोविड रूग्ण असलेल्या राज्यात किटची मागणी वाढली असल्याचे मायलॅब डिस्कव्हरीकडून सांगितले गेले.