Twitter :@maharashtracity

मुंबई

राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी राबविण्यात आलेली विशेष मोहीम,’ या विषयावर विधानसभेत विरोधी सदस्यांनी शासनाला धारेवर धरले. यासंदर्भातील तदर्थ समिती अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात यावा, यासाठी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या अभियानामध्ये लावण्यात आलेले काही वृक्ष झाडाखाली लावून पैसे घेण्यात आल्याचा आरोप केला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले.

मुख्यमंत्र्यांच्यावतीने आज विधासनभेत या समितीच्या पुनर्गठनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत अहवाल सादर करण्याचे निवेदन होताच विरोधी सदस्य आक्रमक झाले. विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चौकशी अहवाल सादर करण्याची मागणी लावून धरली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले.

या विषयावर चर्चा होऊ नये यासाठी अहवाल सादर करण्यासाठी विलंब करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.
राज्यात ३३ कोटी वृक्षलागवड अभियान राबवण्यात आले होते. पुनर्गठन समिती अध्यक्षपदी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य संख्या २१ इतकी करण्यात आली. वर्ष २०२१ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात यापूर्वी वृक्ष अभियान चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here