@maharashtracity

धुळे: कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा (third wave of corona) धोका कमी करण्यासाठी धुळे (Dhule) जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. प्रसन्ना कुलकर्णी यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ७ लाख ८० हजार २२ नागरिकांनी कोरोना लस घेतली. त्यात दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या २ लाख ८९३ तर पहिला डोस ५ लाख ७९ हजार १२९ नागरिकांनी घेतला आहे. तसेच गुरूवारी जिल्ह्यासाठी २९ हजार २८० लस प्राप्त झाल्या.

त्यात २२ हजार कोविशील्ड व ७ हजार २८० कोव्हॅक्सिनचा (Covaxin) समावेश आहे. यापूर्वीच्या ११ हजार ५६० लस शिल्लक आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४० हजार ८४० लस शिल्लक आहे. पहिला डोस घेणार्‍यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणार्‍यांचे प्रमाण कमी असल्यामुळे आता दुसर्‍या डोसवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

त्याचबरोबर गरोदर व स्तनदा मातांचे लसीकरण वाढावे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात फक्त महिलांसाठी जिल्ह्यात स्वतंत्र लसीकरण केंद्र (vaccination centre) सुरू करण्याचे नियोजन केले जाते आहे.

तसेच धुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रात कोव्हॅक्सिनचा साठा नसल्याने ही लस मिळणार नाही. काही दिवसांपासून ही लस मिळत नसल्याची स्थिती आहे. यापूर्वी शहरात कोविशील्डचा (covishield) तुटवडा जाणवत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here