@maharashtracity

राज्यात ७५१ नवीन रुग्ण

मुंबई: राज्यात आज ७५१ नवीन रुग्णांची नोंद झाली. ही आता पर्यंतची सर्वात नीचांकी रूग्ण संख्या आहे. रविवारी ८९२ एवढी रूग्ण संख्या नोंदली होती. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची ( Corona-infected patients ) एकूण संख्या ६६,१८,३४७ झाली आहे.

काल १,५५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६०,६६३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६२% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १३,६४९ ॲक्टिव्ह रुग्ण ( Corona active cases) आहेत.

दरम्यान राज्यात सोमवारी १५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३३,०२,४८९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,१८,३४७ (१०.४६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १,३८,१७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये ( Home quarantine) आहेत तर ८६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ( Quarantine Centres) आहेत.

मुंबईत दिवसभरात २०६:

मुंबईत दिवसभरात २०६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५८६७३ एवढी झाली आहे. तर ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६२८१ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here