@maharashtracity
हृदय, यकृत, दोन मूत्रपिंडाचा ५८ मिनिटांचा लोकल प्रवास
मुंबईत २८ वे अवयवदान
मुंबई: ३४ वर्षीय महिलेने केलेल्या अवयवदानातून (organ donation) चार जणांना जीवदान मिळाले. हे अवयवदान १५ सप्टेंबर रोजी झाले.
कल्याण फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital, Kalyan) उपचार घेणाऱ्या या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचे हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड हे अवयव दान केले. हे अवयव मुंबईच्या लोकल ट्रेन मधून आणले गेले. कल्याण स्टेशन ते दादर स्थानकापर्यंत ५८ मिनिटांचा प्रवास करत ग्लोबल रुग्णालयात अवयव आणले गेले.
झेडटिसीसी समितीने मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांनुसार दान आणि प्रत्यारोपण प्रक्रिया पार पाडली अशी माहिती झेडटीसीसीकडून देण्यात आली.
दरम्यान, मुंबई प्रदेशातील या वर्षातील हे २८ वे अवयवदान झाले आहे. अवयव दात्री महिलेच्या मृत्यू पश्चात नातेवाईकांनी तिचे काही अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. मात्र अवयव दात्याच्या कुटुंबीयांनी माहिती झेडटीसीसीने गुप्त ठेवली आहे.
दान केलेले अवयव जास्तीत जास्त वेगाने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी ट्रेनचा वापर करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी १६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ठाणे ते दादर असा प्रवास करत अवयव रुग्णालयात पोहोचवण्यात आले होते.
दरम्यान हृदय, यकृत आणि किडनीसाठी प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांची यादी वाढत असून बरेचसे लोक अजूनही प्रतिक्षा यादीत आहेत. त्यामुळे, अवयदानाची जागृती आणखी मोठ्या पद्धतीने वाढवली पाहिजे असे मत तज्ज्ञ मंडळीकडून व्यक्त केले जात आहे.