By मिलिंद माने

महाड: गणेशोत्सवाच्या आधी मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे भरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा असा विचार राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde – Devendra Fadnavis) सरकारने केला आहे. मात्र, ठेकेदार ज्या पद्धतीने केवळ माती आणि मुरूम टाकून खड्डा तात्पुरता भरण्याचा उद्योग करत आहे, ते पाहता, चाकरमान्यांचा प्रवास यंदाही अवघड होणार आहे.

मुंबई – गोवा महामार्गाच्या (Mumbai- Goa National Highway) पहिल्या टप्प्याचे चौपदरीकरण अद्याप अपूर्ण आहे. तर दुसऱ्या टप्याचे ७३ टक्के काम पूर्ण झाले असून २७ टक्के काम शिल्लक आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे फाटा ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या कामाला १० वर्षापूर्वी सुरवात झाली. मात्र, ते काम अर्धवट राहिल्याने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हा मार्ग काँक्रीटीकरण करण्यासाठी पुन्हा नव्याने खर्च टाकत काही महिन्यापूर्वी भूमिपूजन केले. लवकरच महामार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले. मात्र या मार्गाचे अद्याप काम सुरू झालेले नाही.

दुसरा टप्पा इंदापूर ते कोकणच्या (Konkan) तळापर्यन्त धारप या कोकणच्या ठिकाणपर्यंत ३५० कि मी चा आहे. या चौपदरीकरण्याच्या कामात २४० कि मी चे काम म्हणजे ७३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, या टप्प्यात ज्या ज्या ठिकाणी काम शिल्लक आहे, त्या त्या ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या टप्प्यात हे खड्डे ठेकेदार (contractor) कंपनीने भरावयाचे आहेत.

ठेकेदार कंपनी पैसा वाचवण्यासाठी पडलेल्या खड्डयात मुरूम आणि मातीचा भराव टाकून मलमपट्टी करण्याचे काम करत आहे. त्यामुळे या भरलेल्या खड्डयांचा काही ही उपयोग होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या गणपती (Ganeshotsav) सणाला चाकरमान्यांचा प्रवास त्रासदायक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here