@maharashtracity

सोमवारपासून आंदोलन सुरु

मुंबई: सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी (Temporary asst medical professor) राजीनामा आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणून १३० प्राध्यापकांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक पदाचा तडकाफडकी राजीनामा अधिष्ठातांकडे सुपूर्द केला आहे. सेवा नियमित करणे, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे (Seventh Pay commission) अशा मागण्यांसाठी राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयातील (medical colleges) प्राध्यापक सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ५०० अस्थायी सहाय्यक प्राध्यापक कार्यरत असून कोरोना काळात (corona pandemic) यांनी रुग्णसेवा करुन देखील सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन आणि इतर भत्ते मिळावेत या मागण्या २०१६ पासून प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्यात आता कोरोनाची तिसरी लाट (third wave of the corona) सुरु असून जीवाची पर्वा न करता वैद्यकीय शिक्षक सेवा देत आहेत. मुंबईतील ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Grant Medical College) व सर जे जे. रुग्णालायच्या (Sir J J Hospital) अखत्यारीत येणाऱ्या सेंट जॉर्ज, जीटी तसेच कामा रुग्णालयात काम करत असताना सध्या अनेक शिक्षक कोविड बाधित झाले आहेत.

मागील कित्येक वर्षांपासून हे सर्व वैद्यकीय शिक्षक मागण्यासाठी सरकार दरबारी निवेदन देत आहेत. मात्र आश्वासनाशिवाय हाती काहीच पडत नसल्याचे डॉ. सचिन मुलपुटकर यांनी सांगितले. तसेच २०१६ साली ७ वा वेतन आयोग लागू होऊनही वैद्यकीय शिक्षकांना देखील हे भत्ते समितीने अद्याप लागू केले नसल्याचे सांगण्यात आले.

हे सर्व भत्ते पूर्वलक्षीत प्रभावाने मिळावेत हि महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेची (Maharashtra State Medical Teachers Association – MSMTA) मागणी आहे असे ह्या संघटनेचे सचिव डॉ. समीर गोलावर यांनी सांगितले.

इतर राज्य डॉक्टरांची भरती करतात किंवा कंत्राटी तत्वावर शिक्षकांचे पद तात्पुरत्या काळासाठी भरले जाते. पण वर्षानुवर्षे वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या अस्थायी सहाय्य्क प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करण्याचे फक्त आश्वासन देऊन वेळकाढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ राजीनामा देण्यात आले असल्याचे या प्राध्यापक डॉक्टरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here