@maharashtracity

बारामती: बारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी. आपल्याला गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सज्ज ठेवण्यासोबतच कोरोनाच्या चाचण्या (corona testing) व सर्वेक्षणात सातत्य ठेवा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना त्याचा विकास कामांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी आज दिले.

बारामतीमधील (Baramati) विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 (Covid-19) विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

यासर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्हीटी रेट वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांनी मास्क वापरावा, कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाची नविन इमारत, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभिकरण, क्रीडा संकुल, देसाई इस्टेट येथील रस्त्याची पाहणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नविन विश्रामगृह इत्यादी कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकास कामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.

पूरग्रस्तांसाठी मदतीच्या साहित्याची वाहने रवाना

▪️बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे 50 हजार रुपयांचे रेनकोट दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठवण्यात आले.

▪️सिद्धिविनायक तरुण मंडळ जाचक वस्ती, सणसर (ता. इंदापूर) यांच्यातर्फे 50 हजार रुपयांचे रेनकोट व भाजीपाला दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

▪️सिल्वर ओक युवा प्रतिष्ठान सणसर (ता. इंदापूर) यांच्यातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे 250 फूड पॅकेट. दरे (ता. महाबळेश्वर) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

▪️अविनाश लगड मित्र मंडळ बारामती यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे 70 फूड पॅकेट. बोर्गेवाडी व जुगाईवाडी तारळे विभाग (ता. पाटण) येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

▪️फेरोरा इंडिया मित्र परिवार, क्षेत्रीय ट्रेकर्स, व क्रिकेट क्लब बारामती यांच्या तर्फे चिपळूण, महाड व रायगड पुरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे 350 फूड पॅकेट पाठविण्यात आले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुग्ध विकास योजनेच्या माध्यमातून बारामती तालुका सहकारी दूध संघाला 261 अडल्टरेशन किट व 74 ए एम सी युनिट मिळाले त्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here