सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

जिल्हा रुग्णालयांच्या आपत्ती व्यवस्थापन तयारीबाबत पुढील आठवड्यात आढावा बैठक

मुंबई: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील (Ahmednagar District Hospital )आगीची घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी आज आदेश दिले.

अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी फायर सेफ्टी ऑडीटसाठी ( fire safety audit) वेगळा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जाणार असून सर्व जिल्हा रुग्णालयांच्या आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयास आग लागलेल्या अतिदक्षता विभागास ( ICU ward) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे ( Deputy Speaker of the Legislative Council Dr Neelam gorhe) , आमदार संग्राम जगताप ( MLA Sangram Jagtap) उपस्थित होते.

अहमदनगर घटना शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला आठ दिवसाच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. सदर समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी व्यक्तींना कठोर शिक्षा केली जाणार असल्याचे ही ते म्हणाले.

अशा दुर्घटना वारंवार घडू नये. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thacheray) यांनी काही सूचना केल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले. यात राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांच्या फायर सेफ्टी ऑडिटकडे गंभीरपणे लक्ष देण्यात येणार आहे. तसेच यासाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्यात बाबत चर्चा करण्यात आली.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये फायर सेफ्टी ऑफिसर पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जाण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. ’मॉक ड्रिल‘सारखे ( Mock drill) उपक्रम राबविण्यात येतील.

यावर बैठक बोलावली असून हिवाळी अधिवेशनात (Winter session) त्याबाबतचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मृतांच्या नातेवाईकांना दोन दिवसांत मदत : दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारकडून देण्यात येणारी ५ लाख रुपयांची तशीच व राज्य आपत्ती निधीमधून २ लाख रुपये अशी ७ लाख रुपयांची मदतीचा धनादेश दोन दिवसाच्या आत मदतीचा धनादेश देण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.

तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दुर्घटनेबाबत योग्य प्रकारे चौकशी करून दोषारोप पत्र दाखल केले जाईल. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना हाती घ्याव्यात अशी सुचना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here