@maharashtracity
वाळू माफीयाविरुध्द गुन्हा दाखल
धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे नायब तहसीलदार अधिकार बाळकृष्ण पेंढारकर यांच्या खाजगी मोटारीवर दगडफेक करणार्या एका वाळू माफियाविरुध्द (sand mafia) शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर महसूल विभागातील कर्मचार्यांनी झालेल्या प्रकाराचा तीव्र निषेध केला.
शिरपूर (Shirpur) तालुक्यातील हिंगोणी शिवारात नायब तहसीलदार पेंढारकर हे दि. 12 जानेवारी रोजी दुपारी चार ते पाच वाजेचा दरम्यान एम.एच 39 एबी 8580 क्रमांकाच्या पांढर्या रंगाच्या मोटारीने गेले होते. वाहन उभे करुन वाहनातून उतरुन ते कारवाईसाठी पुढे गेले असतांना अचानक निखील उर्फ बाळा विश्वास पाटील रा. वनावल ता. शिरपूर याने त्यांच्या मोटारीवर दगडफेक केली. (Stone pelting)
या दगडफेकीत मोटारीची समोरील काच फुटली. यानंतर तहसीलदार आबा महाजन, पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख, महसूल पथक व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
याप्रकरणी नायब तहसिलदार पेंढारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निखील उर्फ बाळा विश्वास पाटील याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला.