@maharashtracity
राज्यात ९,१७० नवीन रुग्ण
एकट्या मुंबईत६१८० रुग्णांची नोंद
मुंबई: राज्यात शनिवारी ९,१७० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,८७,९९१ झाली आहे. काल १,४४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१०,५४१ कोरोनाबाधित रुग्ण (corona patients) बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ३२,२२५ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
तसेच राज्यात काल ७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९१,३६,६४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,८७,९९१ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,००१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत तर १०६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत एक दिवसात ६१८०
हळू हळू मुंबईतील धारावी (Dharavi), माहीम (Mahim) भागानेही रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जी उत्तर भागातील धारावी, माहीम, आणि दादर (Dadar) या भागाने दोन्ही लाटेत मोठी रूग्ण संख्या दिली होती. आताही या विभागांनी रंग दाखवायला सुरुवात केली आहे. या तिन्ही परिसरातून १८७ रूग्ण आढळले.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवारी ६१८० एवढे रूग्ण आढळले. यामुळे आता मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७९०६३९ एवढी झाली आहे. तर दिवसभरात १ मृत्यूची नोंद करण्यात आले. यामुळे मुंबईत आतापर्यंत १६३७७ एवढे कोरोना मृत्यू झाले.