@maharashtracity

महाड: एस.टी. संपामुळे एस.टी.चे वाहक व चालक यांच्यात कमालीचे अंतर झाल्याचे चित्र आज महाड एस.टी. आगारात (Mahad ST Bus depot) पाहण्यास मिळाले. बसमधील प्रवाशांना महाड एस.टी. बस स्टँडमध्ये ठेवून बस मार्गस्थ करण्याचे प्रकार आज महाड आगारामध्ये घडला.

महाड एस.टी. आगारामध्ये खेड – नालासोपारा ही बस आली असता या बसमधील प्रवासी पाणी आणण्यासाठी आगारामधील एस.टी. स्टॉलवर गेला असता त्या प्रवाशाला न घेताच खेड – नालासोपारा ही बस निघून गेली. तर दुसरी घटना पुणे – दापोली या एस.टी. बसबाबत घडली. महाड आगारात हि बस आली असता या बसमधून प्रवास करणारी एक मुलगी पाणी आणण्यासाठी वाहकाला सांगून खाली उतरली असता त्या मुलीला बस स्टॅन्डमध्ये ठेवूनच पुणे – दापोली ही बस महाड आगारातून निघून गेली.

महाड आगारातील वाहतूक नियंत्रकांनी आपले कर्तव्य बजावून या दोन्ही प्रवाशांना दुसऱ्या बसमधून नियोजित स्थळी पाठवण्याचे कसब दाखविल्याने पुढील वादावादीचे प्रसंग टळला. एकंदरीत काय तर एसटी संपामुळे प्रवासी व चालक – वाहक यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आज महाड एसटी आगारामध्ये पाहण्यास मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here