@maharashtracity
मुंबई: निवारा हक्क सुरक्षा समितीच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षी संघर्ष नगर येथील इयत्ता दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व करियर मार्गदर्शन सोहळा कम्युनिटी हॉल, संघर्ष नगर येथे पद्मभूषण आणि माजी खासदार शबाना आजमी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला.
यावेळी मंचावर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, साकीनाका पोलीस स्टेशनचे पंकज परदेशीं, वरिष्ठ अधिकारी उत्तम ढगे, समुपदेशक रामेश्वरी पाटील, निवाराचे दीपक दाते, तानाजी कांबळे, रामभाऊ गजाकोष, विनिता स्टेफन, अनिता जाधव , शेख साहेब, सोनावणे काकी, संयोजक संजत डावरे उपस्थित होते.
या वेळी संघर्ष नगरच्या संस्थापिका माजी खासदार पद्मभूषण शबाना आझमी यांनी संघर्ष नगरात प्राथमिक शाळेसाठी या प्रमाणे आपण मिळून प्रयत्न केला त्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री यांना घ्यावी लागली होती.
त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेसाठी प्रयत्न मिळून करू व मिळवू. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भावी उज्ज्वलं करियरसाठी शुभेच्छा दिल्या. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र , तुळशीचे रोपटे व पेन देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाचे संयोजन निवारा हक्क सुरक्षा समितीचे समन्वयक संजय डावरे यांनी केले होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्या करिता अनिता जाधव, रावण गायकवाड, वसंत खाडे, अशोक पाटील, दिलीप जाधव, प्रकाश शिंदे, मिरजोळकर काका, माणिक शिंदे, सुभाष शिंदे, वीरेंद्र मिश्रा, रेखा हळदणकर, अन्सारी ताई, गीता नाचरे, पाटील ताई, गीतांजली ताई, इम्रान शेख, रमेश कांबळे, श्याम कांबळे, प्रकाश दाहिजे, विजय गायकवाड, भाई चौहान यांनी विशेष परिश्रम घेतले.