@maharashtracity

लसीकरणातील अव्वल स्थान कायम

मुंबई: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत (vaccination drive) शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण डोसेसची संख्या ६ कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) पाठोपाठ महाराष्ट्राने (Maharashtra) ही विक्रमी कामगिरी केली आहे.

दरम्यान, यापूर्वी राज्यात २१ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस अशी सर्वाधिक संख्या नोंदविली होती. तो रेकॉर्ड राज्याने आज तोडून ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण केले. रात्री उशिरापर्यंत या आकडेवारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

तसेच लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम असून राज्यात आजपर्यंत एकूण ६ कोटी १५ लाख १६ हजार १३७ लसींच्या मात्र देण्यात आल्या असून त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना दुसऱ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here