@maharashtracity

राज्यात ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान पाऊस अलर्ट

मुंबई: मुंबई शहर परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २५.२ मिमी एवढ्या पावसाची तर उपनगरात ४३.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली.

तर शनिवारी शहारत ७.२ मिमी तर उपनगरात ८.२ मिमी पाऊस झाला होता. या दोन्ही दिवसात ढगाळलेल्या वातावरणात पावसाची (rain) रिपरिप सुरु होती. राज्यासह मुंबईत (Mumbai) आगामी चार दिवस असाच पाऊस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा आणि निर्माण झालेल्या शीअर झोनमुळे (Shear Zone) राज्यात पुन्हा मान्सूनपूरक वातावरणीय स्थिती निर्माण झाली आहे. यातून राज्यात ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारे भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.

विशेषतः मराठवाडा (Marathwada), मध्य महाराष्ट्र, कोकणात (Konkan) पावसाचा प्रभाव सर्वदूर राहणार आहे. तर ७ आणि ८ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र तीव्रता जास्त सोबत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), नाशिक (Nashik), पुणे (Pune), सातारा (Satara), रत्नागिरी (Ratnagiri) या ठिकाणी ओरेंज इशारा (Orange Alert) दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here