@maharashtracity
मुंबई: राष्ट्रीय अभियानाअंतर्गत (National Campaign) काम करणाऱ्या गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांनी (Asha workers) बुधवारी थकबाकी दिली जावी यासाठी पालिकेच्या (BMC) एफ दक्षिण कार्यालयावर मोर्चा काढला. पालिकेचे उपकार्यकारी अधिकारी डॉ. संतोष रेवणकर ( BMC Deputy Executive Officer Dr. Santosh Revankar) यांची आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी ( Group promoter) भेट घेतली. यावेळेस गेल्या जुलै महिन्याचे मानधन 2 हजार रुपये दिवाळीपूर्वी देऊ असे आश्वासन देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम.ए.पाटील (Maharashtra State Group Promoter and President of Asha Swayamsevak Sangh M. A. Patil) यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ झाली आहे. ते वाढ झालेले मानधन सरकारकडून (MVA) मार्च महिन्यांपर्यंत दिलेली आहे. म्हणजेच जुलै 2020 ते मार्च 2021 पर्यंतचे मानधन त्यांना दिलेले आहेत. पण, गेल्या 7 महिन्यांपासून त्यांना वाढीव 2 हजार रुपये दिले गेलेले नाहीत.
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) आता एप्रिल ते ऑगस्टपर्यंतच्या मानधनाची मंजुरी दिली आहे. हे चार महिन्याचे वाढीव मानधन आता दिवाळीपूर्वी देतील असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, या 2021 च्या जुलै महिन्यापासून आशा स्वयंसेविकांच्या मानधनात हजार रुपये वाढ झाली आहे. पण, शासनाकडून ते पैसे अजून आपल्यापर्यंत पोहोचले नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, हे वाढीव मानधन त्यांना आता दिले जाणार नसल्याने आशा स्वयंसेविकांनी खंत व्यक्त केली आहे.
तर महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ अध्यक्ष एम.ए.पाटील यांनी सांगितले की, आशा स्वयंसेविकांना गेल्या जुलै पासूनचे 2 हजार रुपये जे थकबाकी राहिली होती ती दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पण, या जुलै महिन्यापासून वाढीव हजार मिळण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजेच आशास्वयंसेविकांना एप्रिल ते ऑगस्टपर्यंतची थकबाकी मिळणार असल्याचे सांगितले.
कोरोना काळात (corona pandemic) काम केल्यानंतर कोविड भत्ता ( Covid allowance) देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता त्याचा ही विसर पडला आहे. काही महिने भत्ता दिलाही पण, आता तोही मिळत नाही. आशा स्वयंसेविकांना आतापर्यंत बराच मान-सम्मान मिळाला आहे पण, त्याने पोट नाही भरत असे स्पष्ट मत आशा स्वयंसेविका आशा तुळसणकर ( Asha Swayamsevika Asha tulsankar) यांनी मांडले.
मुंबईत (mumbai) 500 हून अधिक आशा स्वयंसेविका आहेत, यांना दर महिन्याला 1650 रुपये मिळतात. सध्या त्या विना मोबदला कोविड काम करत आहेत. मान मिळतो पण उदरनिर्वाहासाठी सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे तुळसणकर यांनी सांगितले.