@maharashtracity

राज्यात बुधवारी १८६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत ११२ कोरोना रूग्ण नोंद करण्यात आले. कालच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मुंबईचा सहभाग अधिक असल्याचे दिसून येत आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७७,२६४ झाली आहे.

आज १७४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२८,४७१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ९५५ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०१,०९,३६६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७७,२६४ (०९.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ११२ कोरोना बाधित :

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ११२ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५८६२३ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९५६२ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here