@maharashtracity

हदय शस्त्रक्रिया विभाग सुरळीत सुरु

जागतिक हृदय दिन विशेष बातमी

मुंबई: कोरोना काळात ओपन हार्ट सर्जरी संख्येने कमी झाल्या असल्या तरी अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरु होत्या. मात्र नेहमीच्या शस्त्रक्रिया बंद होत्या. गत वर्षी सप्टेंबरपासून शस्त्रक्रिया सुरु झाल्या असून एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात अत्यावश्यक सर्जरी सुरु करण्यात आल्या. तेव्हा पासून आजतागायत पालिकेच्या नायर रुग्णालयात २५० ते ३०० ओपन हार्ट सर्जरी झाल्या (Open Heart Surgery in Nair Hospital) असल्याचे नायर रुग्णालयाच्या हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख प्रा. डाॅ. कनक नागले (Dr Kanak Nagle) यांनी सांगितले.

दिनांक २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करतात. रुग्णालयीन व्यवहार सुरळीत होत आहेत. यात हृदय उपचारावरील माहिती जाणून घेतली असता
सप्टेंबरपासून रुटीन सुरु झाल्याचे सांगण्यात आले. सप्टेंबरनंतर ओपन हार्ट सर्जरी फारशा झाल्या नसल्या तरी हाता पायातील रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या झालेल्या व हृदयाला रक्त पुरवठा सुरळीत करणाऱ्या १० ते १२ हॉस्पिटल सर्जरी झाल्या.

तर सप्टेंबर ते आजतागायत २५० ते ३०० ओपन हार्ट सर्जरी झाल्या. यात व्हॉल्व्ह, लहान मुलांच्या सर्जरी देखील होत्या असल्याचे डॉ. कनक नागले यांनी सांगितले. कोरोना काळात काही रुग्णांना गंभीर विकार जडले. मात्र ते कोरोनामुळे की अन्य कारणामुळे याचा अभ्यास अद्याप समोर यायचा आहे.

ज्या रुग्णांना हृदयाचा त्रास होता अशांना बायपासची गरज आहे. मात्र, त्यांना कोरोना संसर्ग झाला अशा रुग्णाचे आठ आठवडयांनी शस्त्रक्रिया केल्यास समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. या काळात कोरोना संसर्ग नसलेल्या रुग्णाची तसेच कोरोनानेबाधित (corona patient) असलेल्या रुग्णाची आर्टरी बायपास केली असल्यास प्रतिसाद सारखाच होता असल्याचे डॉ. नागले म्हणाले.

मात्र, गुंतागुंत असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटर ऑक्सिजनची गरज या काळात अधिक लागली असल्याचे दिसून आले. पालिकेच्या नायर रुग्णालयात वर्षाकाठी ४५० ते ५०० ओपन हार्ट सर्जरी हाेत असतात. याचप्रमाणे पालिकेच्या केईएम व सायन या दाेन्ही रुग्णालयात एकूण वर्षाकाठी ६०० ओपन हार्ट सर्जरी हाेत असतात.

गतवर्षी केईएम, नायर व सायन ही प्रमुख रुग्णालये काेविड रुग्णालये असल्याने रुग्णसंख्येत व सर्जरीत घट झाली आहे. तरीही, जानेवारी २०२१ पासून पालिका रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी हाेत असल्याचे पालिका वैद्यकीय अधिकारी सांगतात.

धकाधकीचे जीवन तसेच बाहेरील जंक फूड, ताणतणाव यामुळे हदयावर परिणाम हाेत असल्याने, हदयाची काळजी घ्या असा सल्ला वरिष्ठ डाॅक्टर देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here