@maharashtracity
मुंबई: राज्यात ओमिक्रोन बाधित (Omicron patients) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी तूर्तास टाळेबंदी (lockdown) करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. ज्या दिवशी राज्यात ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये टाळेबंदीस सुरुवात होईल, अशा पद्धतीने ठरवण्यात आले असल्याचे टोपे म्हणाले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर प्रकरणे नाहीत. त्यामुळे रूग्णालयात दाखल करण्याचे तसेच ऑक्सिजन (Oxygen) देण्याची गरज असल्याचे प्रमाण नियंत्रणात आहे. राज्यात सध्या ११० मे टन पर्यंत कोविड ऑक्सिजनची मागणी असून या मागणीत ५०० मे. टन किंवा जास्त मागणी वाढल्यास स्थिती चिंताजनक होवू शकेल.
सध्या राज्यात झपाट्याने करोनाबाधितांची संख्या वाढत असून पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या टास्क फोर्स (Task Force) आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत टाळेबंदीचा कोणतीही चर्चा झाली नाही. परंतु, मुंबई (Mumbai), पुण्यासारख्या (Pune) मोठ्या शहरात निर्बंध जरूर वाढवले पाहिजेत.
निर्बंधांबाबत (Restrictions) नक्कीच कठोर कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. खाटांची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन गोष्टींवरून पुढील निर्णय घेतले जातील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.