@maharashtracity
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची (corona patients) संख्या घटत असताना आठवड्याभराच्या कालावधीनंतर गुरुवारी पुन्हा ओमिक्रॉन रुग्ण (omicron patients) नोंद करण्यात आली.
गुरुवारी १२१ रुग्णांची नोंद करण्यात आली. यापूर्वी २ फेब्रुवारी रोजी ११३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर ओमिक्रोन रुग्ण आढळले नव्हते. आजच्या नोंदीनुसार नागपूर – ८२, पुणे शहर – ९, वर्धा – १४, सिंधुदुर्ग – ८,
तर धुळे, लातूर, अमरावती आणि यवतमाळ येथे प्रत्येकी २ रुग्ण आढळले.
या १२१ रुग्णांच्या जनुकीय अqहवालांपैकी (genome Sequencing) ८४ रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) तर ३७ रुग्णांचा अहवाल बी जे वैद्यकीय महाविद्यालने (BJ Medical College) दिला. आता राज्यात ३ हजार ४५५ ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या आजपर्यंत नोंदवली जात आहे. त्यापैकी २ हजार २९१ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात ६,२४८ नवीन रुग्णांचे निदान
दरम्यान, राज्यात गुरुवारी ६,२४८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,२९,६३३ झाली आहे. तसेच काल १८,९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,१२,२३३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२२ % एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण ७०,१५० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात आज ४५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६०,४०,५६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,२९,६३३ (१०.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५३,१७५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत ४२९ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ४२९ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०५२१२८ रुग्ण आढळले. तसेच २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६७८ एवढी झाली आहे.