@maharashtracity
आवाज फाऊंडेशन स्वयंसेवी संस्थेला वाटते अपघाताची भीती
मुंबई: भारतीय वाद्यांच्या सुरांवर हॉर्न वाजवले जातील ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली घोषणा त्वरित मागे घेण्याची विनंती आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आली आहे.
भारतीय रस्ते आधीच जगातील सर्वाधिक अपघात दर दाखवणारे असून नवीन रस्ते आणि महामार्ग अतिशय वेगाने बांधले जात आहेत. हॉर्नचा वापर मनोरंजन म्हणून केला गेल्यास अपघात आणि मृत्यूंमध्ये वाढ होण्याची भीती आवाज फाउंडेशन कडून व्यक्त करण्यात आली आहे. (Awaaz foundation express fear if Indian musical horn would be allowed)
एकाच वेळी मोठ्या आवाजाचे हे हॉर्न वाजवल्यास तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते. आवाजामुळे तणाव आणि चिंता निर्माण होते. तसेच लोकांनी हॉर्नला मनोरंजन मानल्यास पूर्वी पेक्षा अधिक जास्त वापर होऊ शकतो.
मोठा आवाज लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करेल. ध्वनी प्रदूषण नियमांनुसार त्यावर सध्या बंदी आहे. त्यापेक्षा परवाना नूतनीकरणाच्या वेळी ड्रायव्हिंग स्कूल आणि चालकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात रस्त्यावरील गोंगाट कमी करण्यासाठी रणनीती आखावी.
हॉर्नचा आवाज ८५ डीबी हुन अधिक किंवा डेसिबल पातळीच्या आरोग्य-आधारित मर्यादेपेक्षा जास्त नसलेले निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली (Sumaira Abdulali) यांनी सुचवले आहे.
हॉर्न वाजविणे मनोरंजन मानले गेल्यास सुरक्षिततेच्या त्याचे मूल्य ढासळू शकते. असे हि सुमेरा यांनी सांगितले.