बारावी परिक्षा आणि सरकारच्या सकारात्मक प्रतिसादमुळ आंदोलन स्थगित

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असल्याचे विद्यापीठ कर्मचारी महासंघ उपाध्यक्ष केतन कान्हेरे यांनी सांगितले. सध्या सुरु झालेली बारावी विद्यार्थ्यांची परीक्षा तसेच मागण्यांना सरकारकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हे आंदोलन १० मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे कान्हेरे म्हणाले.

दरम्यान, मागण्यांवरील इतिवृत्त राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिताला मंगळवारी मिळाले. मात्र, या इतिवृत्ताचे वाचन कृती समितीच्या संयुक्त बैठकीत होणे गरजेचे होते. त्यामुळे त्याच रात्री म्हणजे मंगळवारी रात्री उशिरा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत इतिवृत्ताच्या वाचनातून सरकार चांगला प्रतिसाद देत असल्याचे ठरले. तसेच बारावीची परिक्षाही सुरु झाले असल्याने परिक्षा काळात आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात आला. हे आंदोलन १० मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे कान्हेरे यांनी सांगितले. 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली १५ फेब्रुवारी रोजी संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. मात्र, बुधवारच्या बैठकीत सात पैकी चार मागण्या मंजूर करण्यात आल्या. यामध्ये उर्वरित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे (implemention of seventh Pay Commission), ५८ महिन्यांची थकबाकी देणे, सुधारित प्रगती योजना लागू करणे, रखडलेली नोकरभरती (recruitment) सुरु करणे या चार मागण्यांचा समावेश आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here