@maharashtracity

मुंबई: चौदाव्या मुंबई महापालिकेची (BMC) मुदत संपल्याने राज्य सरकारने पालिकेचा कारभार हाकण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. तर दुसरीकडे पालिका मुख्यालयातील महापौर, उप महापौर, स्थायी समिती अध्यक्ष व इतर समित्यांच्या अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर व आतमध्ये जी गर्दी कालपर्यंत दिसत होती, आज ती गर्दी गायब झाल्याचे त्याठिकाणी शुकशुकाट दिसून आला.

मुंबई महापालिकेत महापौर यांना प्रथम नागरिक म्हणून मानसन्मान असतो. मुंबईत राष्ट्रपती (President), पंतप्रधान (PM) यासारख्या महत्वाच्या व्यक्ती मुंबई भेटीवर येणार असतील तर त्यांचे विमानतळावर स्वागत करण्याचा मान महापौरांना (Mayor) मिळतो. पालिका मुख्यालयातील महापौर कार्यालयात व बाहेर दररोज विविध कामांसाठी नागरिकांची गर्दी दिसत असे.

हाच प्रकार उप महापौर कार्यालय, स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती, शिक्षण समिती अध्यक्ष आदी विविध समित्यांच्या अध्यक्षांच्या कार्यालायबाहेर नागरिकांची गर्दी दिसत असे. मात्र आता महापौर, उप महापौर, विविध समित्यांच्या अध्यक्ष पदाचा, नगरसेवक पदाचा कार्याकाल संपुष्टात आल्याने आता नागरिकांना आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून पालिकेकडे दाद मागणे, तक्रारी करणे सध्या शक्य होणार नाही.

आता प्रशासक नेमल्याने महापौर, उप महापौर, विविध समिती अध्यक्ष यांच्या कार्यलयासमोर अगदी कार्यालयातही नागरिकांची गर्दी दिसत नाही. नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सर्व समिती अध्यक्षांची वाहने जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अध्यक्षांकडून त्यांना देण्यात आलेली वाहने पालिकेने आपल्या ताब्यात घेतली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here