@maharashtracity

मुंबई: आज राज्यात २५१ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७१,२०२ झाली आहे. तर आज ४४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२०,९२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे (recovery rate) प्रमाण ९८.०९% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,५२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात रविवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८६,४५,५१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७१,२०२ (१०.०१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ४४ बाधित :

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ४४ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५६,३४२ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६९२ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here