Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यात शुकवारी ७२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८१,३५,५२२ झाली आहे. काल ९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८६,५८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण ५३१ सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी राज्यात १ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५५,९६,११७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३५,५२२ (०९.५० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत १८ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,५३,९३६ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७४३ एवढी झाली आहे.