@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी ६७ नवीन कोरोन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,३५,३०९ झाली आहे. तर काल १४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८६,२३० कोरोनाबाधित रुग्ण (Corona patients) बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६७५ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात बुधवारी एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५५,५३,६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३५,३०९ (०९.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १२ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १२ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,५३,८९४ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७४३ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here