@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी ६,१०७ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,१६,२४३ झाली आहे. काल १६,०३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ७५,७३,०६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८९ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ९६,०६९ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राज्यात मंगळवारी ५७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५७,६८,६३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,१६,२४३ (१०.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ६,३९,४९० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ४४७ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ४४७ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण १०५१२५८ रुग्ण आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६६६७ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here