@maharashtracity
मुंबई: राज्यात शुक्रवारी ५२५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,६७,९१६ झाली आहे.
आज शुक्रवारी ९९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१५,७११ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,४७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
तसेच राज्यात शुक्रवारी ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८१,३८,१८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६७,९१६ (१०.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २८,८७८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ५९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत ७८ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ७८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,५५,८८९ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६९१ एवढी झाली आहे.
राज्यात २०६ ओमीक्रॉन बाधित
राज्यात शुक्रवारी २०६ ओमीक्रॉन संसर्ग (omicron patients) असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १४६ रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय आणि ६० रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. हे सर्व रूग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत.
आजपर्यंत राज्यात एकूण ५२११ ओमीक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ४६२९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome sequencing) पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८९४४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ४३८ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.