Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी ५० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८१,३५,७५७ झाली आहे. काल ५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८६,९१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याच सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण ४३१ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तसेच राज्यात मंगळवारी एक कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५६,२९,०७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३५,७५७ (०९.५० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत ६ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ६ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,५३,९७९ रुग्ण आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९७४४ एवढी झाली आहे.