Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी ३४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८१,३६,०३३ झाली आहे. तसेच मंगळवारी ३९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८७,३५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात मंगळवारी एकूण २७३ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर राज्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५७,०१,११७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३६,०३३ (०९.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत ८ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ८ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आतापर्यंत मुंबईत (Mumbai) एकूण ११,५४,०२९ कोरोना रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७४४ एवढी झाली आहे.