@maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी ३३८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,८३,३४८ झाली आहे. काल २७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३३,४५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१०% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २०३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात मंगळवारी एक कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०७,६०,४०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८३,३४८ (०९.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत २१८ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात २१८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण १०,६२,३५४ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६६ एवढी झाली आहे.