@maharashtracity

मुंबई: राज्यात रविवारी २९६२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७९,८५,२९६ झाली आहे. आज ३,९१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,१४,८७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९७.८७% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २२,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात रविवारी ६ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२१,१९,१४६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,८५,२९६ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ७६१ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ७६१ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,१४,१२० रुग्ण आढळले. तसेच ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,६१७ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here