@maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी २६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,८१,२३५ झाली आहे. आज २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३१,८२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१०% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १५५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात मंगळवारी एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०५,९३,७२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८१,२३५ (०९.७८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत १५८ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १५८ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,६०,९२४ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५६६ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here