@maharashtracity
मुंबई: राज्यात गुरुवारी १८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७८,७४,०२४ झाली आहे. आज २१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२५,३३९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे.
राज्यात गुरुवारी १ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,९३,८४,६४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७४,०२४ (०९.९२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच राज्यात आज रोजी एकूण ९०२ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत ४२ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ४२ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण १०,५७,०७३ रुग्ण आढळले. तसेच ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५५९ एवढी झाली आहे.