@maharashtracity

मुंबई: राज्यात गुरुवारी १०८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ८१,३४,८९१ झाली आहे. काल १३१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८५,६३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९८.१७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ८५९ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५४,८९,६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३४,८९१ (०९.५२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत २६ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात २६ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत (Mumbai) एकूण ११,५३,८३६ रुग्ण आढळले. तसेच शून्य रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,७४२ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here