@maharashtracity

बदलापूर: बदलापूर (Badlapur) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि प्रयोगशील युवा नेते कॅप्टन आशिष दामले (Captain Ashish Damle) यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (World Book of Records, London) या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली आहे.

या आंतरराष्ट्रीय संस्थेने कॅप्टन दामले यांनी कोविड-१९ साथीच्या दरम्यान केलेल्या कामाची दखल घेऊन ‘सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट’ (Certificate of Commitment) देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला आहे.

कोविड-१९ (Covid-19) साथ संक्रमणाच्या कालावधीत कोरोना संक्रमणापासून बचाव, लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि कोविड-१९ पासून सुरक्षित राहण्यासाठी केलेले उपाय याची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे.

या पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करतांना दामले म्हणाले, “सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना लोकांच्या प्रतिक्रिया आणि कामाची पावती मिळणं हे कोणत्याही कार्यकर्त्यासाठी बळ देणारे, उत्साह वाढवणारे आणि अधिक जोमाने अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असते.”

ते पुढे म्हणाले, एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेला गौरव हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप समाधान आणि ऊर्जा देणारा आहे. या गौरवाबद्दल मी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांचे मनापासून आभार मानतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here