माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पंढरपूर येथे आषाढी पायी वारीत घेतला सहभाग

@maharashtracity

पंढरपूर: आषाढी वारीच्या निमित्ताने कल्याण पश्चिमचे माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद पवार (Narendra Pawar) यांनी पंढरपूर येथे वारकऱ्यांसमवेत वारीत सहभागी होत अनेक दिंड्यांचे दर्शन घेतले.

गेली अनेक वर्षे युगानुयुगे कर कटेवर ठेऊन विटेवर उभा असलेला विठ्ठल आणि जगाच्या संसाराचा भार वाहणाऱ्या रुक्मिणी मातेला भेटण्याच्या ओढीने लाखो वारकरी पंढरीला (Pandharpur) येत असतात. देशभरातील अनेक दिंड्या आणि पालख्या आषाढी वारीला पायी चालत येतात. त्यांच्या सोबत आज वाखरी, ता. पंढरपूर येथे काही किलोमीटर पायी चालत वारीचा अनुभव नरेंद्र पवार यांनी घेतला.

पवार म्हणाले की वारीत पायी चालणे ही वेगळी अनुभूती आहे. विठू माऊलींच्या जयघोषाने ऊर्जा मिळते. या राज्यात आणि देशात हिंदुत्वाचा (Hindutva) पुरस्कार करणारे राज्य सदैव राहो, शेतकरी, शेतमजूर आणि सर्व घटकांना सुख, समृद्धी आणि शांतता लाभो ही बा विठ्ठलाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या रथाचेही त्यांनी दर्शन घेतले. यावेळी भाजपा (BJP) भटके विमुक्त आघाडी प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड, पश्चिम महाराष्ट्र संयोजक अशोक वणवे, कल्याण जिल्हाध्यक्ष विष्णू सांगळे, ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड, गणेश पोखरकर, भाजयुमो सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आदी पदाधिकारी व वारकरी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here