@maharashtracity
मुंबई: मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांवर गेला असल्याने चिंतनीय बाब झाली आहे. मुंबईत
३५ हजार चाचण्या करून ५०० रूग्ण आढळत आहेत, हे चांगली बाब असली तरी गेल्या १० दिवसात काही दशांश अंकाने पॉझिटिव्हिटी दर वाढ नोंद झाली आहे.
बुधवारपूर्वी हा दर १.४ टाक्के तर त्या आधी दोन दिवस १.७ टक्के एवढा होता. मात्र बुधवारी हा दर २ टक्क्यांवर आल्याने चिंता वाढली. आधी वर खाली होणारा दर स्थिर होऊन २ टक्क्यांपर्यंत वाढला. मात्र हा दर कमी होणे गरजेचे असल्याचे राज्य कोरोना समितीमधील तज्ज्ञांनी (corona task force) सांगितले.
दरम्यान मार्च एप्रिल महिन्यात पॉझिटिव्हिटी दर (positivity rate) १० टक्क्यांवर होता. मात्र आता हा दर 2 टक्क्यांवर आला असल्याने कमी झाल्याचे मत मांडण्यात येत आहे. तर हे टक्केवारी कमी झाली असली तरी ही ०.५ टक्क्यांची वाढ दिसून येते ही बाब चिंताजनक आहे.
या ठिकाणी केरळ (Kerala) राज्याचे उदाहरणं देऊ शकतो. केरळात रूग्ण वाढ दिसत असून टप्प्याटप्प्याने रुद्र रूप घेतले आहे. तीच स्थिती मुंबईत (Mumbai) होऊ नये असे तज्ज्ञांना वाटत आहे.
यावर बोलताना कोरोना मृत्यू निरीक्षण समितीचे डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले की, एकंदरीत पॉझिटिव्ह आणि कालावधी असा मिळून सरासरी काढण्यात येते. सध्या मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांवर आला असला तरी हा दर ५ टक्क्याहून कमी असल्याने समाधानकारक आहे असे म्हटले तरी चालेल. मात्र याहून ही हा दर कमी होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा दर कमी होण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे असा डॉ. सुपे यांनी सुचवले आहे.