@maharashtracity
मुंबई: राज्यात गोवंशीय पशूधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे (lumpy skin disease) लसीकरण करण्यात आले असून अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यांमधील लसीकरण १०० टक्के झाले आहे. तर खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांच्या लसीकरणाच्या (vaccination) एकत्रित आकडेवारी नुसार राज्यात सुमारे ८०.८६ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले. आता बाधित पशुधनापैकी (livestock) एकूण ३१ हजार १७९ पशुधन उपचाराने बरे झाले आहेत.
राज्यामध्ये ३२ जिल्ह्यांमधील एकूण २२३८ गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ५९ हजार ८६५ बाधित पशुधनापैकी एकूण ३१ हजार १७९ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ११५ लक्ष ११ हजार लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण ११३.१४ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ४२१ अहमदनगर जिल्ह्यातील २५२, धुळे जिल्ह्यात ३५ अकोला जिल्ह्यात ३९३, पुणे जिल्ह्यात १३६, लातूरमध्ये २५, औरंगाबाद ७७, बीड ८, सातारा जिल्ह्यात १८२, बुलडाणा जिल्ह्यात ३६७, अमरावती जिल्ह्यात २९६, उस्मानाबाद ९, कोल्हापूर ११७, सांगली मध्ये २४, यवतमाळ ३, परभणी – २, सोलापूर २८, वाशिम जिल्हयात ३७, नाशिक ८, जालना जिल्ह्यात १५, पालघर २, ठाणे २८, नांदेड २५, नागपूर जिल्ह्यात ६, हिंगोली १, रायगड ७, नंदुरबार २१, वर्धा २ व गोंदिया १ असे एकूण २ हजार ५२८ पशुधनाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.