By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
नागपूर: ‘हर घर हर नल’, या घोषणेनुसार शासन ग्रामीण भागात पाणी योजना राबवित आहे. बीड जिल्ह्यातील तालुका गेवराई मौजै गढी येथील योजनाही निश्चित कालमर्यादेत पूर्ण करु, असे उत्तर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिले.
लक्ष्मण पवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. उत्तरात मंत्री पाटील यांनी योजनेचे गुणनियंत्रणबाबत टाटा कन्सल्टन्सीमार्फत पाहणी केली आहे, अहवाल मागविला आहे, असे स्पष्ट केले. पाणी विषयात राजकारण नको, असे आवाहन त्यांनी केले.
रोहित पवार यांनी सोलर संदर्भात विचारलेल्या एका उपप्रश्नाला, जलजीवनमधून ‘सोलर ‘ सुविधा देण्यास वाव आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.