गोवर रुग्णांची नोंद ७९३ वर

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यात गोवर संशयितांची संख्या १२ हजार ५७० वर पोहोचली आहे. तर शुक्रवारपर्यंत निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या ७९३ असून एकूण १८ मृत्यूंची नोंद आहे. राज्यात यंदाच्या वर्षात एकूण ९३ ठिकाणी गोवर उद्रेक (measles outbreak) झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.

दरम्यान, राज्यात गोवर प्रभावित भागात एकूण १ हजार १८४ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत ११ लाख ९४ हजार १३७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर राज्यात २८ हजार ४३४ बालकांना अ जीवनसत्वाची मात्रा देण्यात आली आहे. गोवर रुबेला लसीचा पहिला डोस १० हजार २८८ बालकांना तर दुसरा डोस ७ हजार ९५४ बालकांना देण्यात आला आहे.

गोवर प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात जिल्हा स्तरावर ११ लाख ५५५ हजार ५७० लससाठा उपलब्ध आहे. तर विभागीय स्तरावर १ लाख १९ हदार २५० लसींचा साठा आहे. याखेरीज, राज्य स्तरावर ७९ हजार लस साठा असून एकूण १३ लाख ५३ हजार ८२० लसींचा साठा उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here