कोलाड पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी केले स्पष्ट

@maharashtra.city

महाड: महाड (Mahad) तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील वलंग ग्रामपंचायतीचे सरपंच विचारे यांनी खैरे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यांना संबंधित धरणाचे झालेले काम व सुरक्षिततेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. धरण पूर्णत: सुरक्षित असून नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही, असे रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत पाटबंधारे (irrigation department) उपविभाग कोलाडच्या उप कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.

सरपंच विचारे यांच्यासमवेत रायगड पाटबंधारे विभाग कोलाड अंतर्गत पाटबंधारे उपविभाग कोलाड उपविभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.चितळकर व संबंधित ठेकेदाराचे प्रतिनिधी श्री.मस्के यांनी खैरे धरण असुरक्षित असल्याच्या तक्रारीबाबत धरणाची प्रत्यक्ष पाहणी करून गावकऱ्यांना आश्र्वस्त केले आहे.

खैरे धरणापासून खाली असलेल्या गावांना (खैरे, वलंग, रोहन, जुईनगर) कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही. तसेच पावसाळ्यात धरण सुरक्षिततेबाबत रायगड पाटबंधारे कोलाड उपविभागाकडून दररोज धरण क्षेत्रात जाऊन विशेषतः धरण गळती थांबविण्याचे काम केलेल्या ठिकाणांची पाहणी व देखरेख करण्यात येत आहे, असेही सांगितले आहे

या धरण क्षेत्राची मौजे वलंग, सोनघर, खैरे या ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच काही ग्रामस्थ आणि महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक, तलाठी, ग्रामसेविका यांच्यासमवेत पुन:श्च एकदा दि.11 जुलै 2022 रोजी पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान धरण सुरक्षिततेबद्दल व उर्वरित अश्मपटलाच्या कामाबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

याबाबतही उपविभागाने स्पष्टीकरण देताना असे सांगितले आहे की, धरण सुरक्षितेच्या दृष्टीने धरणापासून मौजे वलंग, सोनघर, खैरे या गावांना कोणत्याही प्रकारचा धोका संभवणार नाही. पावसाळा सुरू झाल्याने उर्वरित अश्मपटलाच्या कामामुळे धरणाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. उर्वरित अश्मपटलाचे काम (Pitching) ठेकेदारामार्फत गावकऱ्यांच्या समाधानाकरिता 2 ते 3 दिवसात सुरु करण्यात येईल. तसेच चालू पावसाळा हंगाम संपल्यानंतर धरणाची उर्वरित कामे आवश्यकतेच्या दृष्टीने तातडीने करण्यात येतील, असे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here