@maharashtracity
मुंबई: राज्यात ऑक्टोबर अखेरीपर्यंत पावसाने काढता पाय घेतला. मात्र मुंबई शहर व उपनगरात पावसाळी आजारांचे रुग्ण वाढत आहेत. यात मलेरिया (malaria) जैसे थे स्थितीत आहे. तर डेंग्यूचा ताप वाढताना दिसून येत आहे. (Rise in dengue patients in the state)
मुंबई शहर (Mumbai) व उपनगरात यंदाच्या वर्षात मागील दहा महिन्यांत मलेरियाचे ४५७९ रुग्ण आढळून आले आहेत. मलेरिया पाठोपाठ गॅस्ट्रोनेदेखील (gastro) मुंबईकरांना हैराण केले आहे. तर बदलत्या वातावरणात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे.
दरम्यान, सन २०२० च्या तुलनेत यंदा मलेरियाच्या रुग्णसंख्येत किंचिंत घट असली तरीही, मलेरिया रोखण्यासाठी पालिका प्रशासनाला अपयश येत असल्याचा आरोप होत आहे. शिवाय नागरिकांमध्येही अजूनही जनजागृतीचा अभाव असल्याचेही समोर येत आहे.
ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे ५७६ रुग्ण आढळून आले आहेत. तर लेप्टो ३२ (leptospirosis), डेंग्यू २५४, गॅस्ट्रो २४७, हेपटीटीस ४१ (hepatitis), चिकनगुनिया ३३ (chikungunya), एच१एन१चे ८ रुग्ण आढळून आले असल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
याशिवाय २०१९ मध्ये मलेरियाचे ४३५७ रुग्ण आढळले होते. तर २०२० मध्ये ५००७ आणि २०२१ मध्ये आतापर्यंत ४५७९ रुग्ण आढळले आहेत. शिवाय गेल्या दहा महिन्यात लेप्टोचे २११ रुग्ण आढळून आले. तर ४ जणांचा लेप्टोने बळी घेतला आहे. तसेच डेंग्यूचे ७३० रुग्ण आढळून आले आहेत, ३ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यु झाला आहे.
ऑक्टोबर २०२१ मधील साथीच्या आजाराची माहिती
आजार रुग्ण मृत्यु
मलेरिया ५७६ ०
लेप्टो ३२ ०
डेंग्यु २५४ ०
गॅस्ट्रो २४७ ०
हेपटीटीस ४१ ०
चिकुनगुनिया ३३ ०
एच१एन१ ८ ०